🗣️🧠📖📚✒️📝🔎
राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९
NATIONAL EDUCATION POLICY-2019
📚✒️📝🗣️🧠📙🔎
आमच्या दृष्टीकोनातून विश्लेषण
🔹🔸🔹🔸🔹🔸
पोस्ट क्र.2
******
2009 ला वैद्यकीय शिक्षणाच्या खाजगीकरणाची व्यापारीकरणाची आणि बाजारीकरणाची प्रक्रिया आरंभ झाली होती
ajadi “Only non-profit trust and societies could
own medical colleges”, असे म्हटले गेले होते. 2019 मध्ये
नवीन शिक्षा नीतीच्या माध्यमातून “Just realised new edu-
cation policy calls for all fee regulations to be
done away with for professional courses” (3
व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थांनी आकारावयाच्या
शुल्कासंबंधात सर्व नियमने काढून टाकण्याची शिफारस नवीन
शिक्षा नीतीच्या मसुद्यात करण्यात आली आहे) आणि हे शिफारस
करून वैद्यकिय शिक्षणाच्या बाजारीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास
नेण्यात आली आहे.
या शिक्षा नीतीच्या मूल्यांकनाचे आमचे निकष
महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज,
बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकाराचा
जाहीरनामा, भारताचे संविधान आणि भारताचे सर्वोच्च असे
घोषित करतात की,
डॉ.
शिक्षण, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासहित सर्वच
स्तरावरील शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे.
(मूलभूत हक्क) आणि ते शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणे हे
राज्याचे दायित्व आहे.
Education is for public good and public
good includes private good also.
(लोकहितासाठी शिक्षण आणि लोकहितात व्यक्तीचे हितही
निहित आहे) म्हणून शिक्षण हे राज्याचे दायित्व आहे.
* आमच्यासाठी शिक्षण हे
मानवमुक्तीचे माध्यम आहे;
समाजपरिवर्तनाचे माध्यम आहे;
समानता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर नवसमाज निर्मितीचे माध्यम आहे;
त्याच वेळी व्यक्तीला सुखी,संपन्न, समृद्ध, प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याचे साधन आहे.
*भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणजे भावी
भारताचे Vision Document, भावी भारत घडवण्याचा
प्रलेख, असा भारत घडवण्यासाठीच राज्याचे, समाजिक,
आर्थिक व राजकीय व्यवस्थांचे प्रयोजन, शिक्षण ही सुद्धा एक
उपव्यवस्था आहे.त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे प्रयोजनसुद्धा संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवणे हेच असावे.*
क्रमशः
*****
संकलन-राजेश जुनगरे यवतमाळ
*****