मागील भागाहून पुढे____
सुजाताने देऊ केलेले अन्न ग्रहण करून ताजातवाना झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागतो. तेव्हा त्याला याची जाणीव होते की, आजवरचे त्याने अजमावून बघितलेले सर्व मार्ग, अनुभव घेतलेले सर्व मार्ग मग ते, भृगु ऋषीच्या आश्रमात पाहिलेला कठोर तपश्चर्येचा-आत्मक्लेशाचा मार्ग, जो वैराग्याचा मार्ग म्हणून सरतेशेवटी सिद्धार्थाने अनुसरला होता तो असो, किंवा आलारकालाम यांनी विशद केलेली सांख्य तत्वज्ञानाची मूलतत्त्वे असोत किंवा ध्यान मार्ग ज्यास म्हटल्या गेले होते, ज्यात मनाच्या एकाग्रतेसाठी त्याकाळी प्रचलित असलेल्या तिन्ही ध्यान शिक्षण पद्धतीचा (आनापानसती, प्राणायाम व समाधी) ज्यात अंतर्भाव होता, त्या तिन्ही पद्धतीही का असेना, या सर्व बाबींचा अनुभव घेऊनही, त्यात अधिकारीता (authority/mastery) प्राप्त करूनही सिद्धार्थाच्या प्रश्नाची समाधानपूर्ती करण्यास, हे सर्व मार्ग अगदीच अयशस्वी झाले होते. कारण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्यापैकी कोणत्याच मार्गाच्या अनुसरणातून मिळू शकले नव्हते. सलग सहा वर्षांचे प्रयत्न फोल ठरल्याने हे अपयश इतके मोठे होते की, कोणाही माणसाला त्यामुळे साहजिकच पूर्णतः वैफल्य आले असते. अर्थातच सिद्धार्थालाही याचे अतिशय वाईट वाटले. पण वैफल्यता (frustration) मात्र त्याला स्पर्शही करू शकली नाही. आपल्याला मार्ग सापडेल याबाबत तो नेहमीच आशावादी होता. [Having refreshed himself with food #Gautama_sat_thinking_over_his_past_experiences. #He_realised_that_all_paths_had_failed. #The_failure_was_so_complete that it could have led anyone into a state of frustration. He was, of course, sorry. But frustration as such did not touch him.]
Ref/संदर्भ : The Buddha and His Dhamma : Page no. 73, Volume 11, Dr. B. R. Ambedkar writing & speeches. Govt. of Maharashtra Published.
(६) क्रमशः
विशेष टीप : बुद्धाच्या धम्मात ‘ध्यान मार्ग’ (आनापानसती, प्राणायम, समाधी) घुसवून/ प्रक्षिप्त करून त्यास ‘धम्ममार्ग’ होय असे म्हणणे, त्यास ‘धम्माचा भाग’ बनविणे हे कितपत योग्य आहे हे बाबासाहेबांच्या अनुयायांनी लक्षात घेतले पाहिजे व तसे करणाऱ्यांचा डाव उधळून लावला पाहिजे.
www.republicantimes.in या वेबसाईटवर सर्व भाग उपलब्ध आहेत.