Thursday , June 19 2025
Home / Maharashtra / धम्मावरती बोलू काही (३)

धम्मावरती बोलू काही (३)

मागील भागाहून पुढे____

आपल्याला पडलेल्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी त्याकाळी प्रचलित व प्रस्थापित असलेल्या तत्वज्ञानाच्या अभ्यासातून व अनुभवातून काही मार्ग सापडतो का याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थाने विविध मार्गांना अनुसरण्याचे ठरविले.

या शोधप्रवासात प्रथमतः भृगु ऋषींच्या आश्रमात गेला असता, त्यांच्याकडून तपश्चर्यंचे निरनिराळे प्रकार व त्यांची फले सिद्धार्थाने समजून घेतलीत व काही काळ तपश्चर्या करणाऱ्या साधू तपस्व्यांचे निरीक्षण केल्यावर सिद्धार्थाच्या हे लक्षात आले की, तपश्चर्यंद्वारे साधल्या जाणारे ‘कायाक्लेश हेच श्रेष्ठत्वाचे मूळ आहे’ अशी यांची धारणा आहे. तेव्हा सिद्धार्थ भृगु ऋषीस म्हणतो,

‘‘या वेळी मी इतकेच सांगू शकतो की, ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दु:खाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्यावी. सांख्य तत्वाज्ञानाचा अभ्यास करावा, स्वत: समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत त्या शिक्षणाची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे.’’

त्याच्या हे लक्षात आले की, स्वतःच्या शरीराला असा क्लेश (त्रास) देऊन त्याला अपेक्षित समस्येवर समाधान मिळणे येथे कदापिही शक्य नाही. कारण तो मार्ग स्वर्गप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी आपल्या शरीरास कष्ट देण्याशी निगडित होता. सिद्धार्थास भेडसावणारा प्रश्न हा ऐहिक जीवनातील सामाजिक कलहासंदर्भात होता. जीवनातील दुःखे कशी नाहीशी करता येतील यासंदर्भात होता. म्हणून तो भृगु ऋषीची आज्ञा घेऊन पुढील मार्गांच्या शोध प्रवासास निघाला.

पुढे सिद्धार्थ गौतम, आलारकालाम मुनींकडे जाऊन त्यांच्याकडून सांख्य तत्वज्ञानातील मूलतत्त्वे जाणून घेतो. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असता, त्याकाळी प्रचलित ध्यानमार्गाचीही (मनाची एकाग्रता साधण्याचे मार्ग) माहिती करून घेतो. ध्यान मार्गाचे तीन पंथ वा तीन प्रकारच्या शिक्षणपद्धती (Three schools) अस्तित्वात असल्याचे त्याच्या निदर्शनास येते.

एका पंथाने/शिक्षण पद्धतीने ‘आनापानसती’ नावाची श्वास-नियंत्रणाची पद्धत अनुसरली होती.

दुसऱ्या पंथाने/ शिक्षणपद्धतीने ‘प्राणायाम’ नावाची पद्धती अवलंबिली होती ज्यात श्वास आत घेणे (पूरक) तद्नंतर श्वास रोखून धरणे (कुंभक) आणि शेवटी श्वास बाहेर सोडणे (रेचक) अशा तीन टप्प्यात ही प्रक्रिया चालत असे. तर

तिसरा पंथ वा शिक्षणपद्धती ही ‘समाधी’ या नावाने ओळखल्या जात होती.

ध्यानमार्गाच्या अशा या तिन्ही पंथात/शिक्षण पद्धतीत एक बाब समान होती ती म्हणजे ‘मनाची एकाग्रता साधण्याचा मार्ग म्हणून ‘श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे’ ! [All these three schools had one thing in common, namely, that #control_of_breathing was the means of achieving Dhyana (Concentration of mind).]

(३) क्रमशः

www.republicantimes.in या वेबसाईटवर सर्व भाग उपलब्ध आहेत.

About republicantimes.in

Check Also

धम्मावरती बोलू काही (४)

मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: