दि. ३०-०८-२०१८ ला महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कार्यालय ग्राम पंचायत दुर्गापुर द्वारा म. गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीचे आयु. अनिल अशोकजी वाघमारे यांचा अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय झाला. रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीची ही नांदी अशीच ग्राम पातळी ते देशपातळीवर सर्व फळ्यांवर विजयी होवो व बाबासाहेबांनी जन्मास घालून दिलेला रिपब्लिकन पक्ष नव्याने उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होवो ! याप्रसंगी निवडून देणाऱ्या सर्व दुर्गापुरवासीय मित्रांचे, आंबेडकरी अनुयायांचे व रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या समता सैनिक दलाच्या झुंजार लढवैय्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन !
💐💐💐💐💐
शुभेच्छुक,
समता सैनिक दल,
भारतीय बौद्ध महासभा तसेच मित्र परिवार,
दुर्गापूर क्षेत्र, चंद्रपूर
www.ssdindia.org
(रिपब्लिकन चळवळीच्या घटनात्मक पुनर्बांधणीसाठी कटिबद्ध)