💥 काळाची आत्यंतिक गरज
संकलन : प्रशिक आनंद, नागपूर
#Proportional_Representation (प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व)
FPTP विरुद्ध PR
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी २६-९-१९५९ ला राज्यसभेत केलेल्या भाषणात शेवटी हे बोलले होते, “केरळमधील कम्युनिस्ट सरकारला मागील सार्वत्रिक निवडणूकीत फक्त ३५% मते मिळाली; हा एक मुख्य आक्षेप आहे. ह्यावर एकच उपाय आहे. हिंदुस्थानात द्विपक्षीय पद्धती अयशस्वी ठरली आहे. सध्या अनेक पक्ष अस्तित्वात आहेत. त्यात पुन्हा स्वतंत्र पक्षांची भर पडली आहे. निरनिराळे दहा पंधरा पक्ष असल्यामुळे मतदान पद्धतीने लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. मतदारांचे खरेखुरे प्रतिबिंब विधी मंडळात पडावे असे वाटत असेल तर त्याकरिता मतदान पद्धतीत बदल करून Proportional Representation ची पद्धत अंमलात आणावयास पाहिजे. अल्पसंख्याकांच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. आजच्या मतदान पद्धतीमुळे अल्पसंख्याक लोकांना, अस्पृश्य आदिवासी आणि इतर, यांना आपले खरेखुरे प्रतिनिधी पाठवता येणार नाही आणि घटनेतील अधिकारांचा अल्पसंख्याकाना कोणताच उपयोग होणार नाही. यांच्या हिताकरिता झगडू शकतील असे प्रतिनिधी पाठवायचे असतील तर Proportional Representation ची पद्धत अंमलात आणावयास पाहिजे”.
____बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे
टीप : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत ‘शेकाफे’चे सरचिटणीस, तद्नंतर शेकाफे, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या सर्व संस्थांचे काही काळ अध्यक्ष, नंतरच्या काळात ‘रिपब्लिकन पक्षाचे’ही अध्यक्षपद भूषविले.)
Special thanks to : Gaurav Somwanshi