हिंदुत्ववादी राजकारणी भारताला व भारतीय लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांना मानवी स्वातंत्र्य मान्य नाही. जे स्वतःच्या आईला शूद्र मानतात व शूद्र जनावराला (गाईला) माता म्हणतात, अशा लोकांकडून विकास होणार नाही.
सध्याच्या सरकारला देशाची व देशातील लोकांची काळजी नसून त्यांच्या विचारधारेची काळजी आहे. त्यामुळे त्यांचा आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरु आहे. भारताचे प्रधानमंत्री जपानला जाताना गीता घेऊन जातात व तेथील राष्ट्रप्रमुखांना ती भेट देतात. हे धर्मगुरूंचे वर्तन ठीक आहे. भारताच्या प्रधानमंत्र्याचे नव्हे.
दिल्लीत यमुना नदीत श्री श्री रविशंकर यांच्या खाजगी कार्यक्रमासाठी भारतीय सैन्याचा वापर केला जातो, हे वर्तन घटनाबाह्य आहे. यात पर्यावरणाचीही वाट लागली. यासाठी पहिल्यांदाच पर्यावरण खात्याने ५ कोटी दंड केला तोही त्यांनी भरला नाही. या कार्यक्रमास भारताचे प्रधानमंत्री मोदी हजर होते. तिथे ज्या घोषणा दिल्या गेल्या त्या विचित्र होत्या. एवढं धाडस रविशंकर यांना कुठून आले? माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्यावेळी गीता व वीणा जाणीवपूर्वक ठेवली जाते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, “राज्यसत्तेवर धर्मसत्तेचा वचक असावा. भारतीय घटनेच्या आधारावर सत्तेत येऊन सत्तेचा वापर घटनाद्रोहासाठी करणे हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे.”
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...