Thursday , June 19 2025
Home / Engg. Suraj Talvatkar / मीच भारताची घटना जाळीन !

मीच भारताची घटना जाळीन !

मीच भारताची घटना जाळीन! 📓🔥
(डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका)

भारताच्या राज्यघटनेला चौथी दुरूस्ती करणारे विधेयक लोकसभेने मंजूर केल्यानंतर ते विधेयक सरकारने मंजूर होण्यासाठी राज्यसभेत मांडले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विधेयकावर १९ मार्च १९५५ भाषण केले. ते दुरूस्ती विधेयक राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत असलेल्या मूलभूत अधिकारांविषयी होते. त्यावर बोलताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या एका विधानाची आठवण झाली. त्यांनी ते विधान २ सप्टेंबर १९५३ रोजी राज्यसभेत भाषण करताना केले होते. ते विधान असे होते, ‘घटना जाळून टाकणारी पहिली व्यक्ती मी असेन.’ त्या विधानाची यावेळी आठवण झाल्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी तसे बोलण्यापाठीमागची त्यांची मनोभूमिका स्पष्ट केली.
“घटना जाळावीशी वाटते,” असे मी म्हणालो होतो, त्यावेळी माझ्या मित्राने ‘मी असे का म्हणलो’ असे विचारले होते. मला मान्य आहे की, त्यावेळी गडबडीत मी त्याचे कारण स्पष्ट केले नव्हते. आता माझ्या मित्राने (ते कारण सांगण्याची) संधी दिली आहे. मला वाटते, (आता) मी ते कारण देऊ शकेन. ते कारण असे आहे की, आम्ही देव येऊन राहण्यासाठी मंदिर बांधले, पण (त्या मंदिरात) देवाची प्रतिष्ठापना करण्याच्या अगोदरच सैतानाने त्याचा ताबा घेतला. (अशा स्थितीत) मंदिर नष्ट करण्याविषयी आम्ही काय करणार? असुरांनी मंदिर ताब्यात घ्यावे, असा आमचा हेतू नव्हता. आमचा हेतू असा होता की, देवांनी ते मंदिर ताब्यात घ्यावे. ‘ती (घटना) जाळणे आवडेल,’ असे मी का म्हणालो त्याचे कारण असे आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मूळचे स्पष्टीकरण इंग्रजी भाषेत पुढीलप्रमाणे आहे:
“My friend says that the last time when I spoke, I said that I wanted to burn the constitution. Well, in hurry I did not explain the reason. Now that my friend has given me the opportunity, I think I shall give the reason. The reason is this: We built a temple for God to come and reside, but before God could be installed, the devil had taken possession of it, what else could we do except to destroy the temple? We did not intend that it should be occupied by the Asuras. We intended it to be occupied by the Devas. This is the reason why I said I would rather like to burn it!”
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेला मंदिर आणि लोकहितकारी व देशहितकारी सरकारला देव म्हणजेच सुर आणि लोकहित व देशहित डावलून स्वार्थ साधण्यात गुरफटलेल्या सरकारला सैतान म्हणजेच असुर मानले आहे. घटनेनुसार नि:स्वार्थ व कल्याणकारी सरकार येण्याची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात विपरीतच घडले होते. म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संतप्त झाले होते.

 

About republicantimes.in

Check Also

धम्मावरती बोलू काही (४)

मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: