भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे.
संसदीय लोकशाही ही संकल्पना बुध्द धम्मावर आधारित आहे. धम्मतत्वावर आधारित राजकीय व्यवस्था सम्राट अशोकाने सर्व प्रथम अंमलात आणली. सम्राट अशोकाच्या यशस्वी राजतंत्राचे नाव ‘गणराज्य’ गणराज्याचे फ्रेंच नाव ‘रिपब्लिकन’ आहे. जगाला लोकशाही कळली ती सम्राट अशोकाच्या गणराज्यामुळे. जगातील पहिले रिपब्लिकन म्हणजे साक्षात तथागत गौतम बुध्द. दुसरे रिपब्लिकन सम्राट अशोक. त्यानंतर प्लेटो, जेफर्रसन, एडीसन, अब्राहम लिंकन आणि महान रिपब्लिकन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदर गेले तरी तथागत गौतम बुध्द व सम्राट अशोकानंतर जगातले सर्वोत्कृष्ट रिपब्लिकन म्हणजे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होय. त्यानंतर निक्सन, फोर्ड, थोरलेबुश, धाकटेबुश, रेगन या महान रिपब्लिकनांचा अमेरिकेला महासत्ता बनविण्यात सिहांचा वाटा आहे.
भारतीय संविधानानुसार लोकशाहीमध्ये सर्व व्यक्ती समान असतात. असल्या पाहिजेत. सर्व समाजसमूह एकाच दर्जाचे, एकाच पातळीवरचे असायला पाहिजे. सर्वांचे नागरिकत्व एका दर्जाचे असायला पाहिजे. एक प्रथम दर्जाचा नागरिक, दुसरा दुय्यम दर्जाचा नागरिक; एक श्रेष्ठ नागरिक, दुसरा कनिष्ठ नागरिक, एक समाज समूह श्रेष्ठ, दुसरा कनिष्ठ असा भेदभाव लोकशाहीत असू शकत नाही. म्हणून जे धर्मनिरपेक्षतेऐवजी धर्मावर आधारित अशा राज्यसत्तेची मागणी करतात, ते वस्तुत: लोकशाही विरोधी राज्याची मागणी करीत असतात. कारण त्यांना हे अभिप्रेत असते की, इथे ज्या धर्माची सत्ता निर्माण होईल त्या लोकांचा दर्जा वरचा व इतर धर्मियांचा दर्जा खालचा. त्याप्रमाणे नागरिकत्वातही बदल. हे लोकशाहीला मान्य नाही. लोकसत्ताकालाही मान्य नाही. म्हणून ज्यावेळी आम्ही लोकशाही, लोकसत्ता इथे निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली, त्याचवेळी आम्ही धर्मनिरपेक्ष राज्यसत्ता निर्माण करु, अशीही प्रतिज्ञा केली, हे आपण लक्षात घेऊया.