लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर मोठा घाला घातला जात आहे. अप्रत्यक्ष, अघोषित आणीबाणीचा हा प्रकार आहे. सत्ता हातात असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांची छाती चौडी झाली आहे. नुकतेच अहमदाबाद विद्यापीठातील श्रेजीक लालभाई अध्यासनाचे आणि विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ आर्टस अँड सायन्सेस’ च्या विंटरस्कूलचे संचालक म्हणून थोर इतिहासकार, विचारवंत रामचंद्र गुहा यांची नियुक्ती झाली होती. अर्थात इतिहास आणि गांधी अभ्यासाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांची ही नियुक्ती केली गेलेली होती. परंतु त्यांच्या नियुक्तीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र विरोध केला. या विरोधानंतर रामचंद्र गुहा यांनी हे पद स्वीकारणे मान्य केले नाही. धर्मांध वृत्तीचे, झुंडशाहीचे प्रस्थ किती वाढत चाललेले आहे आणि आता शिक्षणक्षेत्रही ते कसे आपल्या ताब्यात घ्यायला निघालेले आहे याचे हे पुरेसे बोलके उदाहरण ठरावे. भारतीय राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवी मूल्ये यांना मोडीत काढायची अाहेत. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सूतोवाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो.वैद्य करतात. हे करण्यामागे त्यांचा स्वतंत्र अजेंडा आहे. आणि हा अजेंडा अनेक पातळ्यांवरून त्यांनी राबवायला सुरूवात देखील केलेली आहे. भारताविषयी आणि राज्यघटनेविषयी अधूनमधून त्यांच्या तोंडून थोडाफार आदर व्यक्त होत असला तरी हे ढोंग आहे. सामान्य माणसांच्या सुखदुःखाशी, देशाच्या भल्याशी यांचे काहीही देणेघेणे नाही. रावसाहेब कसबे यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वरूप मूलतः जातीयवादी असून राष्ट्रवादाचा त्यांनी मुखवटा चढवलेला आहे.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...