समाजधारणेबरोबरच समाजनिर्मितीची प्रतिज्ञा वृत्तपत्र करीत असल्यामुळे संघर्षसन्मुखता स्वीकारावीच लागते. शोषण, दास्यता, हुकूमशाही याविरूद्ध जहाल रूप धारण करावेच लागते. परंतु हे सर्वकाळी घडतेच असे नाही. पुष्कळदा आपल्या स्वीकृत कार्यापासून विन्मुख होऊन तत्वच्युती आणि लाचारी स्वीकारणारी पत्रे मानवी कलह आणि नैतिक अधःपतनाला कारणीभूत ठरतात आणि लोकमत जागविणे आणि जगविणे या आपल्या बांधिलकीपासून परावृत्त होऊन सभ्यता, संस्कृती, लोकभावना व लोकमानस ह्यांची प्रतिमा सबल करतात. म्हणूनच वृत्तपत्र हे देशाच्या इतिहासाचा आरसा असतो असे का म्हटले जाते ते लक्षात येईल. विधायकता आणि विध्वंसकता ही दोन्ही रूपे वृत्तपत्राची असू शकतात. आणि ही दोन्ही रूपे वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यरत असतात. नेपोलियन जेव्हा म्हणत असे की, माझ्याविरूध्द मतप्रचार करणारी ही चार वर्तमानपत्र मला एक हजार नंग्या संगीनीपेक्षाही भीतीप्रद वाटतात, यातच वृत्तपत्राचे सामर्थ्य निहित आहे. आजच्या वृत्तपत्रसृष्टीकडे कटाक्ष टाकला तर जनसंवादनिर्मिती कमी अन् जनक्षोभनिर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...