मनुस्मृतीतील शिक्षा वाचल्यानंतर रामाने शंबुकाचा वध का केला, याचा उमज पडतो. लोकशाही समाजव्यवस्थेच्या मुळावरच मनुस्मृती घाला घालते. शूद्रांना तपश्चर्येचा अधिकार नसताना शंबुकाने तपस्या करून ब्राह्मणांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबद्दल धर्मशास्त्रज्ञेनुसार त्याला शिक्षा होणे अपरिहार्य होते. बाबासाहेब म्हणतात, “राम हा शास्त्राज्ञेप्रमाणे वागला आणि म्हणूनच त्याने शंबुकाला अन्य कोणतीही सौम्य शिक्षा न देता देहांताची शिक्षा दिली. अन्य कोणत्याही शूद्राने, तपश्चर्येद्वारे इंद्राचे पद प्राप्त करण्याची इच्छा पुन्हा धरू नये याकरिता रामाने दिलेली शिक्षा योग्यच होती व म्हणून धर्मग्रंथांनी ‘रामराज्य हे आदर्श राज्य म्हटले आहे. हे राज्य लोकशाही तत्वांशी कितीही विसंगत असले, रामाचे आचरण कोणत्याही विवेक माणसाला पटत नसले, त्याने सीतेला दिलेली वागणूक माणुसकीला शोभेशी नसली अथवा स्त्रीवर्गाला अपमानास्पद असली; तरीही रामाचे गुणगान व रामराज्याची महती समग्र हिंदू समाज करीत असतो, कारण मनुस्मृतीचे पालन हा रामराज्याचा आदर्श आहे.” म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे, मनुस्मृतीची व्यवस्था नष्ट करण्यास आमचा समाज कटिबद्ध आहे.
एक झलक:- 👇