देशापुढे आज ज्या प्रकारची आव्हाने आहेत त्याचे मूळ कुठे न कुठे बहुसंख्य पीडित आणि शोषित समाजाच्या प्रश्नांची निगडीत आहे. पण उत्तर शोधण्यात आमचे अग्रकम विपरीत दिशेने जात आहेत, असे सगळे चित्र आहे. राजकीय पातळीवर, संपूर्ण देशभर अस्थिरतेचे वातावरण पसरलेले आहे. राजकीय पक्ष आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत. भ्रष्ट गठबंधन आणि भावनात्मक घोषणा यापलीकडे त्यांच्याजवळ क्रियाशील असे कार्यक्रम उरले नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक राजकीय पक्ष सत्तासंपादनासाठी बहुसंख्यांक इतर मागासवर्गीय समाजाला भूलथापा देऊन आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. सांस्कृतिक पातळीवर धार्मिक मूलतत्ववाद आपला अक्राळविक्राळ चेहरा घेऊन नव्याने गोंधळ घालत आहे. प्रश्न असा दिसतो की, बहुसंख्य शोषित, पीडीत समाजाचे मूळ समस्येपासून लक्ष विचलित करणे आणि त्याला भूतकाळातील मोहक जाळ्यात अडकवून ठेवणे, शैक्षणिक किंवा सामाजिक पातळीवर लहानमोठी आश्वासने, ताबडतोबीच्या सवलती इत्यादी लोकप्रिय प्रयोगांच्या आधारे सरळसरळ सौदेबाजी केली जात आहे. एकूणच परिस्थिती भयानक आहे.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...