रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – मुक्ती आंदोलन
👉रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (संस्थापक:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर) को घराणेशाही से मुक्त करके एक जनआंदोलन तैय्यार करने की दिशा में आज नागपूर के बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह मे एक मिटिंग का आयोजन किया गया। इसमें महाराष्ट्र के अनेक जिल्हे से आए प्रतिनिधियों अपना सहभाग दर्ज किया। कार्यक्रम का सूत्रसंचालन गोंदिया से आए हुए अमितकुमार भालेराव सर इन्होने किया।
💥 अमितकुमार भालेराव सर:-
👉हमें सोचना पडेगा कि, देश के अंदर जो समस्याएँ है, वो किस तरह से खत्म होगी? मनुवादी लोग संविधान बदलने की बात करें तो हम चिंतित होते है। हमारे लोगों के उपर अन्याय होता है तो हम चिंतित होते है। लेकिन रिपब्लिकन पक्ष खडा करने के लिए हम चिंतित नहीं है। हमारी समस्या की जड क्या है ये ही हमे पता नही। हमें अपनी लीडरशिप खडी करनी पडेगी। देश मे मुसलमानों का, शीखों का, ब्राह्मणों का राजनीतिक दल है। लेकिन बौध्द लोगों का राजनीतिक दल नही है। इस देश के बौद्धों के राजनीती कि जरूरत महसूस नहीं होती ये शोकांतिका है। बुद्धीस्ट अगर नेतृत्व नही करेंगे तो हमारे प्रोब्लेम कैसे हल होंगे?
💥 भारत थूलकर सर:-
👉या काळातल्या ब्राह्मणवाद्यांना हे संविधान मान्य नाही, म्हणून ते नेहमीच संविधान बदलण्याची भाषा करतात. भारतीय संविधान हे तथागत बुध्दांच्या तत्वज्ञानावर आधारित आहे. काळाची गरज ओळखून बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की रिपब्लिकन पक्ष उभारण्यासाठी आता सज्ज व्हा! इकडे तिकडे भटकू नका. या आता भानावर! सरांनी आपल्या जोशपूर्ण वाणीने सभागृहातील सगळे वातावरण अगदी बदलूनच टाकले.
💥 मायाताई उके मॅडम:-
👉RPI एकत्रीकरणाचे वारे ४/५ वर्षापासून सुरू झाले आहेत. नेते एकत्र येत नाही म्हणून समाज एकत्र यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कृती आराखडा तयार करून लोकांपर्यंत आता रिपब्लिकन पक्ष पोहचवावा लागेल.
💥 सतिश बनसोड सर:-
👉आज आम्ही ठरविले तर येणाऱ्या पिढीसाठी आम्ही नवीन रस्ता तयार करु शकतो. आम्ही निवडणूका दुसर्यांसाठी लढतो त्यामुळे आमची वोटबँक विखुरली गेली आहे. रिपब्लिकनचा एक उमेदवार आम्ही उभा नाही करू शकत अशी दुरावस्था आहे. म्हणूनच हे मुक्ती आंदोलन या सर्व प्रकारच्या मानसिकतेला ठेचण्यासाठी आहे. समाजाचा जो आमचा कार्यकर्ता तुटलेला आहे त्या सर्वांना आम्हांला जोडावे लागेल.
💥 सुरज तळवटकर:-
👉मुख्य संयोजकांच्या अधिपत्याखाली जिल्हा वाईस संयोजन समिती स्थापन करून रिपब्लिकन आंदोलनाला योग्य दिशा दिली जाईल. रिपब्लिकन आंदोलनाची संपूर्ण भूमिका मा.रमेश जीवने सरांनी तयार केली आहे. त्यांना आपण सर्व मिळून साथ देऊया.
💥 उमेशसिंग गौतम सर:-
👉अपनी दमदार वाणी से पूरे सभागृह का माहोल एकदम शांत करने के बाद उमेशसिंग सर ने समता सैनिक दल का इतिहास और योगदान के बारे में बहुत ही महत्वपूर्ण जानकारी दी। रिपब्लिकन पक्ष सक्षम करने के लिए समता सैनिक दल भारत भर आंदोलन करेगा। साथ ही साथ भारतीय बौद्ध महासभा का काम भी संविधानिक तरीके से होने की अपेक्षा व्यक्त की।
💥 रमेश जीवने सर (अध्यक्षीय भाषण):-
👉आंबेडकरी चळवळीत लोकशाहीचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. राजकारणात नैतिकता आणली पाहिजे. व्यक्तीचे सुख हा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (संस्थापक:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर) या पक्षाने केंद्रबिंदू मानला आहे. बहुजन आणि मुलनिवासी या संघटना रिपब्लिक राष्ट्रासाठी घातक आहेत. आंबेडकरी चळवळीत आर पी आय मुक्ती आंदोलन करावे लागेल अशी वेळ आंबेडकरी चळवळीवर येईल असे वाटले नव्हते. रिपब्लिकन हा शब्द केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अजिबात गट नाहीत. (आपल्याकडे याचे कागदोपत्री पुरावे आहेत.) रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडियाचे आम्ही जन्मजात हक्कदार आहोत. आपल्या समाजाने राजकीय गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडियाच्या घराणेशाहीला ठोकर मारणे गरजेचे आहे. आपली ओळख बुध्दीस्ट आणि विचारधारा रिपब्लिक असली पाहिजे. आमचा समाज प्रगल्भ झाला पाहिजे. नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची धमक आपल्यात निर्माण झाली पाहिजे.
नागपूर.
दि. ७ जानेवारी, २०१८
सरिता सातारडे.
S.P.Talvatkar®✍