या देशात आता नवपेशवाई येण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेला हे सरकार जुमानत नाही. अर्थात भारतीय राज्यघटना यांच्या डोक्यात नाहीच. डोक्यात आहे ती मनुस्मृती! त्यामुळे अधूनमधून ते ‘राज्यघटनेच्या जागी भगवद्गीता’ असे बरळत असतात. “संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत.” असे जाहीरपणे केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे म्हणतात. या विधानातून यांचे काय इरादे आहेत ते आता पूर्णपणे स्पष्टच झालेले आहे.
भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य सर्व भारतीय लोकांना बहाल केलेले आहे. वाईटांविरुध्द बोलणे आणि निधड्या छातीने सत्य जनतेसमोर मांडणे हे तर माणुसकीचा गौरव करणारेच असते. देशाच्या वाईट परंपरा खोडून त्या जागी सत्य प्रस्थापित करणाऱ्या वृत्ती या देशासाठी केव्हाही महत्वाच्याच असतात. वाहतेपणाच देशाला समृध्दता बहाल करीत असतो. तामिळनाडूमधील पेरूमल मुरूगन हा सच्चा लेखक! परंतु येथील हिंदुत्ववाद्यांनी या लेखकाचे काय केले? त्याच्यावर एवढा दबाव आणला की, लेखक पेरूमल मुरूगनला आपला मृत्यू घोषित करावा लागला. केवढी ही असहिष्णुता? केवढी ही घोर नाकेबंदी? राणा अय्युब यांचे अलीकडेच प्रसिध्द झालेले ‘गुजरात फाईल्स’ हे पुस्तक पाहावे, म्हणजे या देशातील हिंदुत्ववाद्यांचा काळाकुट्ट, जहरी चेहरा आपल्या लक्षात येतो. भारतीय राज्यघटनेच्या विरोधी दिवसाढवळ्या काम करणारी माणसे पाहिली म्हणजे यांची वाटचाल कोणत्या दिशेकडे चालली आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...