💥 काँग्रेसला धडकी 💥
बाबासाहेबांना १९३० ते १९३६ या काळात फार कष्ट पडले आहेत. त्यांच्या प्राणावर बेतले तरी त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी इंग्रज सरकारशी व निरनिराळ्या पक्षातील पुढाऱ्यांशी विरोध करुन व बंड उभारून आपल्या समाजास मानाचे स्थान मिळवून दिले. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व फार मोठे आहे. त्यावेळी काँग्रेसचे पुढारी व काँग्रेस जनांच्या हृदयात धडकी भरत असे. बाबासाहेब काय करतील किंवा काय बोलतील याबद्दल त्यांना भीती वाटत होती.
काँग्रेसने बाबांना राजकारणातून उठविण्याचे बरेच प्रयत्न केले. त्याकरिता त्यांनी डाॅ.आंबेडकर देशद्रोही आहेत असे आरोप केले. डाॅ.आंबेडकरांना आपल्या देशातील परकीय गुलामी अशीच टिकवायची आहे असाही आरोप केला. हा आरोप असत्य होता, हे परिस्थितीने ठरविले आहे. काँग्रेसची त्यामागील भावना अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवून न देण्याची होती. अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळू नयेत म्हणून काँग्रेसने नेहमीच प्रयत्न केला.
बॅ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या भाषणातून.
दि. १४ एप्रिल १९५६