सरंजामी वृत्तीचे मूठभर धनदांडगे सोडले तर बाकी सर्व मराठा, कुणबी समाजाला आणि पूर्वाश्रमीच्या बहिष्कृत वर्गासह तमाम मागासवर्गीय, आदिवासींना रोजी, रोटीची चिंता आहे. मुला बाळांच्या नोकरी, रोजगाराचे प्रश्न सतावत आहेत. जागतिकीकरणाने दोघांचेही जीवन उध्वस्त केले आहे. महागाईने डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. या दोन समाजात फूट कशी पडेल, हे दोन लढाऊ समाज एकत्र येऊ नयेत म्हणून येथील जातीधर्माचे ठेकेदार आणि भांडवलदार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. डावपेच आखत आहेत.
गरीब मराठे आणि मागासवर्गीय, बहिष्कृत, आदिवासी यांचा शत्रू समान आहे. भांडवलदार आणि भटजी! यांना ठेचण्यासाठी त्यांचे मनसुबे उधळण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. या दोन बलाढ्य शत्रूशी एकएकटे लढणे म्हणजे स्वतःचा नाश ओढाऊन घेणे आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणावर कब्जा करुन बसलेले हे डायनासोर विघटित असणाऱ्या, आपापसात लढणाऱ्या समाज समूहांना गिळंकृत करतील.
संविधानिक मार्गाने मोर्चे जरुर काढावेत. पण समाजाच्या व्यापक हितासाठी. शत्रूविरुध्द काढावेत. तमाम मागासवर्गीयांसह, मराठा समाजातील कुणालाही आत्महत्या करायची वेळ येणार नाही. रोजी, रोटीची चिंता मिटेल, उच्च नीचता संपेल अशी समतावादी व्यवस्था निर्माण करायची असेल तर शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुध्द वज्रमूठ बांधून, खांद्याला खांदा लाऊन मोर्चे काढावे लागतील. आम्ही आपापसात लढाई, झगडा करीत राहिलो. मोर्चे प्रतिमोर्चे काढीत राहिलो तर शोषण करणारी व्यवस्था तसेच शोषण करीत राहिल. शत्रू आबादानी होईल. काय करायचं ते ठरवणं आमच्या हाती आहे. दोन्ही समाजातील धुरीनांनी याचा गांभीर्याने विचार करावा. बळी बनायचे का व्यवस्थेचा बळी घ्यायचा, एकदा ठरवावे.
Check Also
धम्मावरती बोलू काही (४)
मागील भागाहून पुढे____ आलारकालाम हा ध्यानमार्गा अंतर्गत येणाऱ्या तिन्ही प्रकारच्या पंथात/शिक्षण पद्धतीत प्रभुत्वसंपन्न (अधिकारिता संपन्न/master) ...