🏭 #व्यवसायात_पदार्पण 💵💸
संग्रहकर्ता: इंजी. सुरज तळवटकर
व्यवसाय करताना देखील काही #बंधने आपोआप येतात. मोठ्या व्यक्तीच्या मुलाने ‘असे करु नये, तसे करु नये’ असे लोक म्हणतात. बाबासाहेब सांगतात, “यशवंताला एकदा कोणीतरी दोघा #धंदेवाईकांनी गाठले होते. माझ्याकडून त्यांचे काहीतरी काम करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी त्याला विमानाने दिल्लीला आणले होते. तो माझ्या कार्यालयात येऊन मला म्हणाला की, “मी आणलेल्या या दोघांना फक्त आपल्या #सहीची आणि #शिफारसीचीआवश्यकता आहे.” मी त्याला खडसावून सांगितले की, “सुडक्या! मी इथे भारताचा कायदेमंत्री आहे. #इथे_मी_तुझा_बाप_नाही. तुझा बाप दादरच्या हिंदू काॅलनीतील राजगृहामध्ये. अगोदर केबीनच्या बाहरे जा पाहू.”
यशवंतराव यांना काही #उद्योगात गुंतवून सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी बाबासाहेबांनी आपले मित्र #नवल_मथेला यांच्या साहाय्याने काही उद्योग सुरु करुन देण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्योगात त्यांचे मन रमले नाही. उद्योगातील छक्के-पंजे त्यांना पचनी पडले नसावेत. ते #सरळ_मनाचे होते. लोकांची मने दुखवून, खोटे बोलून आपण व्यवसाय पुढे न्यायचा ही कला त्यांना जमली नसावी. त्यांचे #मन_समाजशील होते. त्यामुळे ते धंद्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.
भय्यासाहेबांनी एक #सिमेंटचा कारखाना काढला होता. या कारखान्यात २५ भागीदार होते. या कारखान्याबाबत कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांकडे तक्रार केली. शेवटी कारखाना बंद पडला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात #बांधकाम करण्याचा उद्योग सुरु केला. हा व्यवसाय व्यवस्थित सुरु असताना कुणीतरी बाबासाहेबांचे कान भरले. तुमचा मुलगा तुमच्या नावाचा गैरवाजवी फायदा घेतो, असे सांगितले. तोही उद्योग त्यांना बंद करावा लागला. त्यांनी #प्रिंटिंग_प्रेस हा छापखाना सुरू केला. तो दंगलीमध्ये जाळण्यात आला.
आपल्या मुलाला #परदेशात शिकायला पाठवावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. परंतु #यशवंताच्या_अस्वास्थ्यामुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
#सूर्यपुत्र_यशवंतराव_आंबेडकर या पुस्तकातून
