🍾🥃🍻 आधी दारूबंदी की आधी सार्वत्रिक शिक्षण? 📖📚👨🏫
असा सवाल आम्हांला कोणी विचारला तर ‘आधी सार्वत्रिक शिक्षण’ असाच आम्ही जवाब देऊ. शिक्षणप्रसार सार्वत्रिक झाल्यास दारुबाजीला आळा घालणे सोपे जाईल, इतकेच नव्हे, दारुबंदीसंबंधाची लोकांची मागणी विशेष नेटाने पुढे येईल, याविषयी आमची खात्री आहे. शिवाय, दारूबंदीचे धोरण अंमलात आणण्याच्या बाबतीत सरकारने टोलवाटोलवीच चालविली आहे. सध्याच्या स्थितीत पूर्ण दारूबंदी केव्हा अंमलात येईल हे मुळीच सांगता येणार नाही. मग दारूबंदी नाही आणि सार्वत्रिक शिक्षणही नाही. अशी स्थिती पत्करण्यात अर्थ तरी कोणता? त्यापेक्षा तूर्त, दारूबंदीचे धोरण अंमलात आणण्याच्या दृष्टीने, अबकारी उत्पन्न भरून काढण्याकरिता लोकांना जो नवीन कराचा बोजा सोसावा लागेल. तो त्यांनी पत्करावा आणि सार्वत्रिक शिक्षणाची सुधारणा तरी आपल्या पदरी पाडून घ्यावी. साठे कमिटीने दारूबंदीच्या बाबतीत जी करांची वाढ सुचविली होती तिचा उपयोग प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याकरिता होईल तर एक महत्त्वाचा प्रश्न हातावेगळा होईल. सदरील कमिटीच्या शिफारसीमध्ये सुधारणेस जागा नाही असे नाही. परंतु ते धोरण सक्तीच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यास थोडे बहुत उपयोगी पडू शकेल. काही झाले तरी शिक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकता कामा नये.
बहिष्कृत भारत 📰✒
शुक्रवार ता. ३१ मे १९२९
संपादक:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर