भारतीय संविधानाने आम्हांला काय दिले? असा आराडाओरडा करणाऱ्यांसाठी ही पोस्ट…. 👇
🌺 मूलभूत हक्क (Fundamental Rights) 🌺
लोकांना आपले जीवन चांगल्या रीतीने जगता यावे यासाठी त्यांना काही मूलभूत हक्क देणे आवश्यक असते. म्हणूनच निरनिराळ्या देशातील घटनाकारांनी घटनेमध्ये मूलभूत हक्कांची तरतूद करुन ठेवलेली अाढळते. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यघटनेने नागरिकांना प्रदान केलेले मूलभूत हक्क पुढीलप्रमाणे आहेत :-
१) समानतेचा हक्क (Right to Equality)
२) स्वातंत्र्याचा हक्क (Right to Freedom)
३) शोषणाविरूद्ध हक्क (Right against Exploitation)
४) धर्मस्वातंत्र्याचा हक्क (Right to Freedom of Religion)
५) संस्कृती व शिक्षणविषयक हक्क (Cultural and Educational Right)
६) संविधानिक उपाय योजण्याचा हक्क (Right to Constitutional Remedies)
एकंदरीत सबंध प्रकरणाचा विचार करता मूलभूत हक्कांचे प्रकरण म्हणजे “भारतीय लोकशाहीचा मजबूत व टिकाऊ असा आधार, सार्वजनिक वर्तणुकीचे नियम सांगणारी संहिता व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करणारा प्रचंड बुरूज होय.” मूलभूत हक्क हा भाग संविधानाचा प्राण आहे. सांसदीय लोकशाहीचा ढाचा भारतीय समाजव्यवस्थेला पोषक व्हायला हवा हाच दृष्टिकोन ठेवून संविधानकर्त्यांनी मूलभूत हक्काची रचना केलेली आहे.