दि. १४ ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या सभेत खालील बाबींवर एकमताने ठराव पास करण्यात आले.
रिपब्लिकन पक्ष एकाधिकारशाहीतून खुला करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कृतीकार्यक्रम मंजूर करण्यात आला.
१. सर्वप्रथम प्रत्येक जिल्ह्यातून रिपब्लिकन प्रेमींनी जिल्हाधिका-यांना निवेदन देणे.
२. रिपब्लिकन पार्टी च्या कृतसंकल्पासाठी कार्य करणा-यांची एक सभा पुढील महिन्यात नागपूर येथे आयोजित करुन विखुरलेल्या स्थितीत वैयक्तिक व संघटना स्थापून काम करणा-यांमधून निवडक व्यक्तींची एक आंदोलन कार्यकारिणी बनविणे.
३. त्यानंतर आंदोलन सुरू करुन पक्ष जनतेसाठी खुला करुन घेणे, एल्गार पुकारुन स्वाभिमानाने सदस्यता मोहिम सुरु करण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजणे.
एस. राजेंद्रन् अध्यक्ष व डॉ. राजेंद्र गवई (स्मृतिशेष रा.सु.गवई यांचे पुत्र) राष्ट्रीय सरचिटणीस असलेला सांप्रत पक्ष हाच मूळ रिपब्लिकन पक्ष (RPI) आहे, ह्याचा देशभर प्रभावी प्रचार व प्रसार दमदारपणे करुन उभ्या देशाचे लक्ष सोशल मिडीया इलेक्ट्रॉनिक, वृत्तपत्रे इत्यादिंच्या माध्यमातून वेधून घेणे या बाबींशी सर्वांनी सहमती दर्शविली.
४. रिपब्लिकन पार्टी चा कृत संकल्प राबविणा-या सर्वांमध्ये सुसंवाद, सुसूत्रता आणण्यासाठी आपसी वैमनस्य, जाहिर टीका यापुढे अवलंबिण्यात येणार नाही, याची काळजी घेणे.
सभेला रमेशजी जीवने, प्रशीक आनंद, अमित भालेराव, जयबुद्ध लोहकरे व इतरांनी संबोधित केले.
१४ ऑक्टोबर २०१७ हा दिवस नवक्रांतीदिन ठरला.
सर्वांचे अभिनंदन !
कार्याला सुरुवात करा.
नवीन इंदुरकर (सदस्य – आर. पी. आय. मुक्ती आंदोलन)