🌾🎋 साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का? ✊
सोमवार ता.१० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या बैठकीस मुंबई कौन्सिल हाॅलमध्ये सुरूवात झाली. या बैठकीच्या वेळी असेंब्ली हाॅलवर कोकण, सातारा, नाशिक वगैरे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नेण्याचे आगाऊ जाहीर केले होते. त्याचप्रमाणे हा शेतकऱ्यांचा मोर्चा संघटित व योग्यरीतीने यशस्वी करण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष व इतर शेतकरी संस्थानी सहकार्य करून एक “मोर्चा कमिटी” निवडून तिच्या नेतृत्वाखाली हा शेतकऱ्यांचा अपूर्व मोर्चा कौन्सिलवर नेण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे ता.१० रोजी वरील ठिकाणचे सर्व शेतकरी आपल्या मिरवणुकी घेऊन दुपारी दीड वाजता आझाद मैदानावर जमले. — या मिरवणुकीबरोबर “खोती पध्दती नष्ट करा”, “सावकारशाहीला मूठमाती द्या”, “शेतकऱ्यांचा विजय असो” वगैरे आशयाच्या मोठमोठ्या पताका फडकत होत्या. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकारही करण्यात येत होता. काँग्रेस सारख्या अधिकाररुढ सत्तेविरूद्ध हे शेतकऱ्यांनी संघटित उभारलेले बंड पाहून त्यांना भीती व आश्चर्य वाटल्यास नवल नाही. — वीस ते पंचवीस हजारापर्यंत शेतकरी बांधव आझाद मैदानावर मिरवणुकीला तयार झाले. या एवढ्या मिरवणुकीची शिस्त व संघटना पाहून कुणालाही कौतुक वाटल्यावाचून राहणार नाही.
शेवटी ही मिरवणूक पुन्हा आझाद मैदानावर आल्यावर, स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरविण्यात आली. — डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करावयास उभे राहताच त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले, कष्टाळू लोकांची संघटना करावयाची झाल्यास त्यात जातिभेद, धर्मभेद यांना मुळीच थारा मिळता कामा नये. हा कष्टाळू वर्ग अगोदरच बिकट आर्थिक दडपणाखाली दडपला गेलेला आहे. अशा परिस्थितीत जी संघटना झाली आहे तीत मी म्हणत आहे त्याप्रमाणे विषमता दिसता कामा नये. आणि आज मी म्हणत आहे अशा तऱ्हेचे सर्व जातींच्या कष्टाळू वर्गाचे हे संघटन पाहून मला आनंद होत आहे. म्हणूनच आजचा दिवस मी मोठ्या भाग्याचा समजतो. कारण की आजची आपली ही संघटना केवळ स्वार्थत्यागाच्या बळावर उभारलेली आहे. श्रमजीवी वर्गाने यासाठीच श्रीमंत वर्गाच्या म्हणजेच काँग्रेससारख्या पक्षाशी सहकार्य करुन किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोगी नाही. आपणास माहीतच आहे की या जगात ज्याचे घर पेटते, ज्याच्या घराला आग लावली जाते त्याचे व जो आग लावतो त्याचे कधी तरी संगनमत होईल काय? आपण साधारणपणे प्राणिमात्राकडेही दृष्टी फेकली तरी साप व मुंगूस कधीतरी एकत्र होऊ शकतील का? तसेच उंदीर-मांजराची मैत्री जमेल का? अशारीतीने निसर्गाविरुध्द सृष्टी निर्माण करणाऱ्याविषयी आपण कधीतरी विश्वास बाळगाल का? आणि आपण त्या दृष्टीने श्रीमंतांची पाठीराखी काँग्रेस हिच्याकडे पाहिले पाहिजे. —असल्या फसव्या लोकांची यापुढे खरी पूजा पायाच्या ठोकरीने केली पाहिजे. आणि आपला खरा हितकर्ता कोण हे निवडताना यापुढे फार सावधगिरी बाळगा. —तुमचे खरे हितकर्ते कोण, कोणता पक्ष तुमच्यासाठी प्राणाचीही पर्वा न करता झगडण्यास समर्थ आहे. याची तुम्हीच निवड करा.
— आपण कल्पना करा की आपल्या देशात कष्टाने आपले पोट भरणारे शेकडा ८० आहेत. या संख्येच्या मानाने इतर वर्ग किती अल्प आहेत याची कल्पना करा. परंतु केवळ अज्ञानामुळे आणि या वरिष्ठ म्हणणारांच्या हाती सत्ता असल्यामुळे आपणासारख्या बहुसंख्याक जनतेला ते शह देऊ शकतात. परंतु आपण सर्व लोक जागृत झालात. तुम्हाला तुमचे हित कशात आहे हे संघशक्तीने आणि स्वावलंबनाने कळावयास लागले तर आपण एका चुटकीसरशी सर्व अधिकार आपल्या हाती घेऊ शकाल. आज जसे आपण संघटितपणे येथे आला आहात तसेच जातिभेद-धर्मभेद विसरून आपली संघटना जोरदार करा.
आपण कोकण प्रांतातील स्थिती पाहिली तर खोतादी सावकार लोक अवघे हजार किंवा दोन हजार असतील आणि तुम्ही काबाडकष्ट करणारे लोक १३ लक्षावर आहात. अशा परिस्थितीत आपण इतके दुबळे का, याचे मला मोठे आश्चर्य वाटले. आज हजार दोन हजार लोक आपणासारख्या १३ लक्ष लोकांवर हुकुमत चालवीत आहेत. याचे मूळ कारण आपली दारूण गरिबी होय. तुम्ही या मूठभर श्रीमंतांकडून पिळले गेला आहात. तुमच्यामध्ये या पिळलेल्या अवस्थेत प्रतिकार करण्याची शक्तीच राहिली नाही. यासाठी ज्यांनी तुमची अशी असह्य अवस्था केली त्या खोतादी श्रीमंतांना यापुढे कोणत्याही प्रकारचे साहाय्य करु नका आणि ही गोष्ट सुध्दा लक्षात ठेवा की काँग्रेस या धनिकांना दुखवून तुमचे हित करणार नाही.
डाॅ.बाबासाहेबांनी मुंबई सरकारपुढे सादर केलेल्या मागण्यांमध्ये ४ मूलभूत मागण्या व १६ तातडीच्या मागण्यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांचे कैवारी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
ता. १० जानेवारी १९३८
#टीप:- हे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग २ पा.नं. ७२-७८ पहा.
ही सत्ता भाजप सहसासहजी सोडणार नाही. भाजपचे नेते अनेक प्रकारचे खेळ करुन जनतेच्या मनात हिंदू धर्माबद्दल विशेष आपुलकी निर्माण करीत आहेत. भाजपमध्ये जे विचारमंथन चालू झाले आहे, ते भारतीय राज्यघटनेच्या मुळावर घाव घालणारे आहे. हा मुद्दा सर्व सेक्युलरवाद्यांनी भारतीय जनेतच्या मनावर बिंबवला पाहिजे. जर विरोधी पक्ष व इतर पक्ष याबाबतीत उदासीन राहिले तर भविष्यकाळात भारतामध्ये नाझी व फॅसिस्ट तत्वज्ञानांचा नवा आविष्कार प्रत्ययाला येऊ लागेल. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य शिल्लक राहणार नाही. स्वतंत्र विचार मांडण्यास बंदी घातली जाईल. थोडक्यात म्हणजे, जर भाजपला गुजरातप्रमाणे यश मिळाले तर राष्ट्रीय आघाडी आपोआप बरखास्त होईल व एकट्या भाजपचे राज्य स्थापन होईल. भारतीय राज्यघटना आमूलाग्र बदलण्यात येईल. एका नव्या धर्मसत्तेची स्थापना होईल. राजकीय स्वातंत्र्य नष्ट होईल. तशीच वेळ अाली तर विरोधी पक्षांना काम करण्याची संधी नाकारण्यात येईल. सर्व नागरिकांनी या धोक्याची जाणीव ठेवून हिंदुत्वाची कल्पना त्याज्य मानली पाहिजे.